

पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : कळंबोली सेक्टर १६ परिसरात एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १२ लाख ३५ हजारांचे दागिने आणि एक लाखाची रोख रक्कम असा एकूण १३ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रुबी संतोष पात्रो (वय ४९) या कळंबोली येथील पृथ्वी इमारतीमध्ये राहतात. ९ मार्चला सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घराला टाळे असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील दागिने आणि रोकड लंपास केली. सायंकाळी रुबी पात्रो या घरी आल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि लाखाची रोख रक्कम ऐवज चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.