

नामदेव जगताप यांचे निधन
पालघर ः जिल्ह्यातील पत्रकार सचिन जगताप यांचे वडील नामदेव जगताप (७१) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (ता. १०) निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पालघर पूर्वेकडील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नामदेव जगताप गिरणी कामगार म्हणून मुंबईत होते. त्यांनी दुग्धव्यवसाय विभागात पालघर येथे नोकरी केली. त्यांनी एसटी महामंडळातही काम केले आहे. मूळचे कोल्हापूर येथील असलेले जगताप पालघरमध्ये स्थायिक झाले होते. या वेळी सामाजिक, राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा नरेंद्र, सचिन तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.