

उत्तनकरांच्या नाकीनऊ
रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीने हैराण
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेने कचरा घरोघरी जाऊन उचलण्याची यंत्रणा उत्तनमध्ये कार्यान्वित केलेली नाही. अशातच रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रहिवासी दुर्गंधीच्या त्रासाने हैराण झाले आहेत.
दररोज निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. शहरी भागात सफाई कर्मचारी इमारतीत जाऊन कचरा गोळा करतात. मात्र, उत्तनमध्ये अशी कोणतीच यंत्रणाच कार्यान्वित नाही. त्यामुळे रहिवाशांना नाइलाजास्तव रस्त्याच्या कडेलाच कचरा आणून टाकावा लागतो. काही जण ओला कचरा रात्रीच्या वेळी समुद्रात नेऊन टाकतात. विशेष म्हणजे, उत्तनमधील रहिवासी कचराभूमीच्या समस्येने त्रस्त आहेत. सर्व शहाराचा कचरा अनेक वर्षांपासून उत्तनमध्ये साठवला जात आहे. असे असताना स्थानिक भागांमधील कचरा पालिकेकडून उचलला जात नाही. त्यामुळे नाराजीचे वातावरण असल्याने नगरसेवक शॉन कोलासो यांनी सांगितले.
----------------------------------
दूषित पण्यातून पायपीट
उत्तन परिसरातील २० ते २२ ठिकाणांवर रस्त्याच्या कडेलाच कचरा साठून राहिलेला असतो. हा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने अनेक दिवस तसाच पडून असतो. त्यामुळे कचऱ्यांतून निघणारे दूषित पाणी रस्त्यावर येत असल्याने त्यातूनच पायपीट करावी लागते.
----------------------------------
दिरंगाई भोवणार
कचऱ्यांच्या प्रश्नावरून उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी बुधवारी (ता. ११) बैठक घेतली. या बैठकीत उत्तनमधील नगरसेवक कोलासो, नगरसेविका शर्मिला बागाजी, फ्रीडा डिमेलो, अतिरक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त सचिन बांगर उपस्थित होते. उत्तनमधील दाटीवाटीच्या वस्तीमध्ये छोट्या हातगाड्यांद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करावा तसेच कचरा उचलण्यात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.