जय‌ हनुमान तळवली संघ ठरला विजेतेपदाचा मानकरी

जय‌ हनुमान तळवली संघ ठरला विजेतेपदाचा मानकरी
Published on

ग्रामीण क्रिकेटमध्ये जय‌ हनुमान तळवली संघ विजेता
रोहा, ता. १२ (बातमीदार) : स्वतःच्या होम ग्राउंडवर जय हनुमान तळवली संघाने सर्वोत्तम कामगिरी करत क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाचा बहुमान पटकावला. ही स्पर्धा कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनअंतर्गत जय हनुमान तळवली यांच्यातर्फे आयोजित केली होती.
व्यवस्थापक छाया वाघ, मार्शल डिसोजा, मारुती कोलाटकर, रामचंद्र मरवडे, मदन कोलाटकर, गणेश कोस्तेकर, संजय मरवडे, भगवान मरवडे यांच्या हस्ते उद्‍घाटन केले. अंतिम सामन्यात प्रथम जय हनुमान तळवली संघाने फलंदाजी करीत असताना तीन शतकांच्या सामन्यात १८ चेंडूंत ४० धावांची खेळी केली. यामध्ये संघातील अष्टपैलू खेळाडू हर्षद धाकटे, अथर्व जाधव, सिद्धेश शेडगे यांनी गोवे संघासमोर धावांचा डोंगर रचला. तळवली संघाने चांगले क्षेत्ररक्षण १२ धावा आणि तीन गडी राखून हा सामना जिंकला.
या स्पर्धेत मालिकावीर म्हणून श्री सोमजाई गोवे संघाचा निखिल वाफिलकर, उत्कृष्ट फलंदाज श्री शिवशंभो गोवे संघाचा विनायक जवके, उत्कृष्ट गोलंदाज जय हनुमान तळवलीचा सिद्धेश शेडगे तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक श्री शिवशंभो गोवेचा समीर दहिंबेकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जय हनुमान तळवली संघाचे सर्व क्रिकेट खेळाडू व मंडळाच्या सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

फोटो ओळ :
रोहा ः जय हनुमान तळवली संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com