वाशीमध्ये ‘विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता’ विषयावर चर्चासत्र

वाशीमध्ये ‘विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता’ विषयावर चर्चासत्र

Published on

वाशीमध्ये ‘विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता’ विषयावर चर्चासत्र
फादर ॲग्नेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी आयोजन
खारघर, ता. ११ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या भारतीय मानक ब्युरो संस्थेच्या वतीने वाशी येथील फादर ॲग्नेल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ‘विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शुक्रवारी (ता. १३) दुपारी दीड वाजता होणार आहे.
या चर्चासत्रात भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई पश्चिम विभागाचे अधिकारी संजय त्रिवेदी मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक विकासात विद्यार्थी व्यवहार अधिष्ठात्यांची भूमिका, महाविद्यालयीन व्यवस्थापनातील त्यांचे योगदान आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच अभियांत्रिकी शाखेतील निवडक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यवस्थापन आणि विद्यार्थी कल्याणविषयक बाबींची माहिती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com