रोहा पं.स.सभापतीपदी विजया पाशिलकर,उपसभापतीपदी संजय मांडलूसकर बिनविरोध

रोहा पं.स.सभापतीपदी विजया पाशिलकर,उपसभापतीपदी संजय मांडलूसकर बिनविरोध
Published on

रोहा सभापतीपदी विजया पाशिलकर
उपसभापतीपदी संजय मांडलूसकर बिनविरोध
रोहा, ता. ११ (बातमीदार) ः रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी विजया विनोद पाशिलकर तर उपसभापतीपदी संजय संभाजी मांडलूसकर यांची बिनविरोध निवड झाली. बुधवारी (ता. ११) पंचायत समिती सभागृहात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना रोहा तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, कार्याध्यक्ष समीर शेडगे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, गटनेते महेंद्र गुजर, माजी सभापती राजेंद्र जैन, महेश कोलटकर, महेंद्र दिवेकर, सदस्य सुरेश मगर, किसन मोरे, जगन्नाथ धनावडे, वर्षा देशमुख, अरुणा, बाबुराव बामणे, प्रदीप देशमुख, जयवंत मुंडे, अनंत देशमुख, राजेंद्र पोकळे, नरेश पाटील, रोहिदास पाशिलकर, मनिषा पाटील, नंदकुमार म्हात्रे, संतोष भोईर, राकेश शिंदे, अनिल भगत, शेणवई सरपंच प्रगती देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहा पंचायत समितीच्या निवडणुकीत या निवडणुकीत राष्ट्रवादीने आठपैकी सहा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. पंचायत समितीच्या गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, शिवसेनेचा एक आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. नवीन सभापती व उपसभापती यांच्या निवडीमुळे रोहा पंचायत समितीच्या कारभाराला आता नवे नेतृत्व लाभले असून तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फोटो कॅप्शन :
रोहा ः पंचायत समिती सभापतीपदी विजया पाशीलकर समवेत उपसभापती संजय मनादळुस्कर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com