माणगावमध्ये महायुतीची सत्ता

माणगावमध्ये महायुतीची सत्ता
Published on

माणगावमध्ये महायुतीची सत्ता
सभापतिपदी शिंदे गटाचे विलास शिंदे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या मनीषा मालोरे
माणगाव, ता. ११ (वार्ताहर) ः माणगाव पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक माणगाव पंचायत समितीमध्ये बुधवारी (ता. ११) घेण्यात आली. यामध्ये पाटणूस गणातील पानसई गावचे शिवसेनेचे विलास शिंदे यांची सभापतिपदी, तर तळाशेत गणातील इंदापूर येथील राष्ट्रवादीच्या मनीषा मालोरे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. यामुळे माणगाव पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली आहे.
पीठासन अधिकारी म्हणून माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी काम पाहिले. या दोघांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सभापती विलास शिंदे यांची कार्यकर्त्यांनी पंचायत समितीपासून ते माणगाव बाजारपेठेतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, ॲड. महेंद्र मानकर, ज्ञानदेव पवार,अनिल नवगणे, आप्पा म्हामूणकर, विपुल उभारे, गजानन मोहिते, सुभाष केकाने, शेखरशेठ देशमुख, काका नवगणे, उदय अधिकारी, संदेश मालोरे, रुपेश तोडकर, राजेश कदम, मेघनाथ सातपुते, बाळा खातू, निलेश थोरे आदी मान्यवर तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास
शिंदे गटाचा सभापती व उपसभापती होणार म्हणून दोन दिवस अगोदरच माणगावमध्ये बॅनर झळकले होते. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी सभापती विलास शिंदे व शिवसेनेचे उपसभापती ज्ञानदेव पदरत यांची बिनविरोध निवड होणार म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माणगाव पंचायत समिती आवारात गर्दी केली होती, परंतु अचानकपणे वरिष्ठांच्या आदेशाने उपसभापती पद हे राष्ट्रवादीला देण्यात येणारआले. यामुळे कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला असून, पंचायत समिती आवारातून काढता पाय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com