तुर्भेगाव येथे पारंपरिक धवल गीत स्पर्धा उत्साहात

तुर्भेगाव येथे पारंपरिक धवल गीत स्पर्धा उत्साहात

Published on

तुर्भेगाव येथे पारंपरिक धवल गीत स्पर्धा उत्साहात
आगरी-कोळी संस्कृती जपण्यासाठी महिला दिनानिमित्त उपक्रम; २७ स्पर्धकांचा सहभाग
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त स्व. डी. आर. पाटील व स्व. भोलानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ तुर्भेगाव येथे पारंपरिक धवल गीत स्पर्धा-२०२६ (पर्व-२) उत्साहात पार पडली. माजी नगरसेवक व माथाडी कामगार नेते चंद्रकांत रामदास पाटील आणि नगरसेविका कविता पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालयात आयोजित करण्यात आला.
स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला, त्यापैकी आठ स्पर्धक नवी मुंबईबाहेरील होते. परीक्षक म्हणून चंद्रकला दासरी, अवनी पाटील आणि नवनाथ ठाकूर यांनी काम पाहिले. कार्यक्रमात आगरी-कोळी संस्कृती जपणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ओपन गटात शानाबाई राजाराम जोशी प्रथम, बानुबाई ठाकूर (उलवे) द्वितीय, तर गीता भोईर (दहीसर) तृतीय ठरल्या. नवी मुंबई गटात चौथुबाई भोईर (वाशीगाव) प्रथम, नानुबाई म्हात्रे (कोपरखैरणे) द्वितीय आणि इंदूबाई भोईर (गोठीवली) तृतीय ठरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com