

जनतेचा विश्वास-विकासाचा ध्यास, कर्जतचा कायापालट
नवनिर्वाचित सभापती नमिता घारे यांचा निर्धार
कर्जत, ता. ११ (बातमीदार) ः तब्बल तीन वर्षांहून अधिक काळानंतर पंचायत समितीत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुन्हा कामकाज सुरू होत आहे. त्यामुळे थांबलेली विकासकामे पुन्हा गतीने सुरू करून ‘जनतेचा विश्वास-विकासाचा ध्यास, कर्जतचा कायापालट हाच आमचा श्वास’ या संकल्पनेनुसार काम करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सभापती नमिता घारे यांनी व्यक्त केला. कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे यांची सभापती पदी, तर ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांची उपसभापती पदी बुधवारी (ता. १) निवड झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार धनंजय जाधव व गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या देखरेखीखाली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये या दोघींची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर दोघींनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. नमिता घारे म्हणाल्या की, कर्जत तालुका हा ५५ ग्रामपंचायती आणि २२३ गावांनी जोडलेला मोठा तालुका आहे. सध्या ५५ पैकी ३९ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट असून १६ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व गावांपर्यंत विकासाच्या योजना व सुविधा पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पुष्पा दगडे, ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख दीपक श्रीखंडे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपसभापती चित्रा ठाकरे यांनीही मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.