अज्ञाताकडून तरुणाची ऑनलाईन लाखोंची फसवणूक

अज्ञाताकडून तरुणाची ऑनलाईन लाखोंची फसवणूक
Published on

अज्ञाताकडून तरुणाची ऑनलाइन लाखोंची फसवणूक
भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : कर्जासाठी कोणताही अर्ज केलेला नसतानाही, बँक खात्यातून परस्पर सात लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करून ती रक्कम ऑनलाइन पद्धतीने लांबवल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत समोर आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोनगाव येथे राहणारे मनोज पंजाराम बेडकुळे (३४) यांचे एचडीएफसी बँकेच्या भांडुप शाखेत वेतन खाते आहे. १४ जानेवारी रोजी मनोज घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. त्यामध्ये त्यांच्या खात्यावर सात लाख १४ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर झाल्याचे नमूद होते. विशेष म्हणजे, मनोज यांनी अशा कोणत्याही कर्जासाठी बँकेत अर्ज केला नव्हता.
काही वेळातच चोरट्याने मनोज यांच्या बँक खात्याचा ताबा मिळवून, कर्जाची रक्कम आणि खात्यात असलेले आधीचे पैसे असे एकूण ७ लाख ४६ हजार ९०० रुपये ऑनलाईन पद्धतीने दुसऱ्या खात्यावर वळवले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनोज यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मनोज बेडकुळे यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी अशा संशयास्पद मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com