‘वारकरी भवन’ नामफलकातील त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी

‘वारकरी भवन’ नामफलकातील त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी
Published on

‘वारकरी भवन’ नामफलकातील त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी
सीबीडी सेक्टर ३A येथील इमारतीवरील अपूर्ण नावाबाबत दिपाली घोलप यांचे निवेदन
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : सीबीडी सेक्टर ३A येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘वारकरी भवन’ इमारतीवरील नामफलकात गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना महिला विभागप्रमुख दिपाली घोलप यांनी बेलापूर अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
इमारतीच्या नामफलकावर पूर्ण नाव असणे अपेक्षित असताना सध्या लावलेल्या फलकावर ‘करी’ हा शब्दभाग गायब असल्याने नाव अपूर्ण दिसत आहे. त्यामुळे इमारतीचे नाव चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित होत असून ही बाब महानगरपालिकेसारख्या सार्वजनिक संस्थेसाठी अयोग्य असल्याचे घोलप यांनी नमूद केले.
महानगरपालिकेच्या इमारतीवरील नामफलक हा त्या इमारतीची अधिकृत ओळख दर्शवणारा महत्त्वाचा घटक असल्याने त्यावर योग्य व संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे. या त्रुटीमुळे महानगरपालिकेबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते, अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली.
त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन ‘वारकरी भवन’ इमारतीवरील नामफलक दुरुस्त करून योग्य नाव लावावे, अशी मागणी दिपाली घोलप यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com