तळोजा सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी सिडकोचीच : एमआयडीसी
तळोजा सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी सिडकोचीच : एमआयडीसी
आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीनंतर एमआयडीसीचे लेखी स्पष्टीकरण
खारघर, ता. ११ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांची मागणी पूर्ण करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडून तळोजा वसाहतीत दररोज सरासरी सहा ते सात दलली पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खारघर, तळोजा फेज-१ व फेज-२ या सिडको क्षेत्रातील ग्राहकांना पाणीपुरवठा करणे ही सिडकोची जबाबदारी असल्याचे एमआयडीसीकडून लेखी उत्तर देण्यात आले आहे.
तळोजा येथील रहिवासी व इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीचे पदाधिकारी राजीव सिन्हा यांनी तळोजा वसाहतीतील पाणी समस्येबाबत ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत तळोजा एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश गाधडे यांनी लेखी स्पष्टीकरण दिले.
तळोजा वसाहत ही जलवाहिनीच्या टॅपिंग पॉईंटच्या शेवटच्या टोकाला असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. औद्योगिक ग्राहकांची मागणी पूर्ण केल्यानंतर उर्वरित पाणी सिडकोकडे पाठवले जाते. त्यानंतर तळोजा फेज-१ व फेज-२ मधील पाणी वितरण व्यवस्था सिडकोकडून केली जाते.
दरम्यान, तळोजा वसाहतीतील पाणी समस्या अनेक वर्षांपासून कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच सिडकोच्या नव्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा कसा केला जाणार, याबाबतही चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

