वसईच्या विकासासाठी आमदार स्नेहा दुबे यांचा विधानसभेत आवाज
वसईच्या विकासासाठी आमदार स्नेहा दुबे यांचा विधानसभेत आवाज
वसई ता. ११ (बातमीदार) : राज्याच्या अर्थसंकल्प चर्चेत वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे यांनी वसईच्या सर्वांगीण विकासासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे येणाऱ्या काळात वसईच्या विकासाला चालणा मिळेल, असे विश्लेषकांचे मत आहे.
या वेळी आमदार स्नेहा दुबे यांनी वसईमध्ये एमआयडीसी आणि आयटी हब स्थापन करण्यासह स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची मागणी केली. तसेच कातकरी समाजाच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण आणि योजनांचा विस्तार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच वसई-नालासोपारा-विरार परिसरात अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीआयएस आधारित ‘नवीन झोपडपट्टी प्रतिबंधित धोरण’ लागू करण्याची मागणी केली. तसेच वसई-विरार महापालिकेला स्वतःच्या शाळा आणि शिक्षण व्यवस्थेसाठी आवश्यक निधी व अधिकार देणे, वसईतील उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रलंबित ११४ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देणे, पोलिसांसाठी निवासस्थान उभारणे अशा मागण्या केल्या. तसेच त्यांनी वसईच्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मान्य केल्याबाबत शासनाचे आभारही मानले.
नायगाव पुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी तसेच इतर पुलांसाठी मंजुरी देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे आमदार स्नेहा दुबे यांनी सांगितले. बुलेट ट्रेन, रिंग रोड, मेट्रो आणि वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांमुळे वसई-पालघर परिसराचा विकास अधिक वेगाने होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना पंख देणारा ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
-----------
राज्याचा अर्थसंकल्प हा प्रगतिशील, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा आहे. सामाजिक समता आणि समरसता साधण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद हा स्वागतार्ह निर्णय आहे.
- स्नेहा दुबे, आमदार, वसई विधानसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

