ण पंचायत समिती सभापतीपदी स्मिता पाटील तर उपसभापती संजय डंगर यांची निवड

ण पंचायत समिती सभापतीपदी स्मिता पाटील तर उपसभापती संजय डंगर यांची निवड
Published on

पेण पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व
स्मिता पाटील सभापती, तर संजय डंगर उपसभापती पदी बिनविरोध
पेण, ता. ११ (वार्ताहर) : निवडणुका पार पडल्यानंतर बुधवारी (ता. ११) पेण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये भापजच्या स्मिता पाटील यांची सभापती पदी, तर संजय डंगर यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत पेण पंचायत समितीच्या दहा जागांसाठी भाजपने आठ जागांवर विजय संपादन केले. तर दोन जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले होते. यानंतर पेण पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या कार्यालयात झाली. यावेळी केवळ दोनच अर्ज दाखल झाल्याने स्मिता पाटील आणि संजय डंगर यांची बिनविरोध निवड जाहीर केले.
यावेळी अस्मिता पाटील, मेघा पाटील, कमल पवार, संजय डंगर, विवेक म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, सुशांत खाकर तर ठाकरे गटाचे संजय भोईर, प्रीती पाटील असा दहा सदस्य उपस्थितीत होते. यावेळी नवनिर्वाचित सभापती उपसभापतींचे खासदार धैर्यशील पाटील, माजी अध्यक्षा नीलिमा पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, सभापती महादेव मानकर, माजी नगरसेवक शोमेर पेणकर, बांधकाम सभापती स्मिता पेणकर आदिंसह कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com