स्मार्ट मीटरची सक्ती नको

स्मार्ट मीटरची सक्ती नको
Published on

स्मार्ट मीटरची सक्ती नको
बेस्ट समितीत शिवसेनेचा (ठाकरे) विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वितरण प्रक्रिया अधिक अद्ययावत करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर योजना अमलात आणली आहे; मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्याआधी पैसे भरा. नंतर स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्यात येतील, असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले. विजेचा वापर न करता आधी पैसे भरल्यामुळे वीजग्राहकांना आर्थिक फटका बसेल, असा मुद्दा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक नितीन नांदगावकर यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत मांडला.

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून १० लाख ८० हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा होतो. यातील अडीच लाखांपेक्षा जास्त ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. एकूण वीजग्राहकांपैकी सहा ते सात लाख निवासी भागातील ग्राहक आहेत. राज्य सरकारने निवासी भागात स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती दिली होती. त्यानंतरही मुंबईत सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची कामे पाहता आज झालेल्या बेस्ट उपक्रमाच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा अधोरेखित करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे बेस्ट समितीतील सदस्य नितीन नांदगावकर यांनी यासंदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. बेस्ट उपक्रम सर्वच वीजग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावत आहे. स्मार्ट मीटर प्रीपेड असल्याने आधी पैसे भरायचे. त्यानंतर वीज वापरावी लागत आहे.

भाजपचे बेस्ट समितीतील सदस्य सुनील गणाचार्य यांनी गेल्या दोन वर्षांपासून स्मार्ट मीटर बसवण्याची सेवा सुरू आहे. या स्मार्ट मीटरचा नेमका फायदा काय, त्यामागील उद्देश काय यासाठी त्याचे सादरीकरण करण्याची मागणी केली. मुद्द्याला उत्तर देताना समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी मुंबईतील सामान्य जनतेला त्रास होईल अशा स्मार्ट मीटरची सक्ती नको, असे सांगत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com