कळंबोलीत शेळीपालनाच्या आड ड्रग्जचा धंदा

कळंबोलीत शेळीपालनाच्या आड ड्रग्जचा धंदा
Published on

कळंबोलीत शेळीपालनाच्या आड ड्रग्जचा धंदा
पाच लाखांचे एमडी जप्त; ‘लुंगीवाला’ टोळी गजाआड

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथे शेळीपालनाच्या नावाखाली सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे. ‘कादरी गोट फार्म’वर छापा टाकून पोलिसांनी पाच लाख ३९ हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले असून, कुख्यात वसीम लुंगीवाला आणि त्याचा साथीदार अम्रान पटेल याला अटक केली आहे.
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शहर नशामुक्त करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तळोजा पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातील फरार आरोपी वसीम लुंगीवाला आणि अम्रान पटेल हे सेक्टर १३-ई येथील ‘कादरी गोट फार्म’मध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने १० मार्च रोजी छापा टाकला.
झडतीदरम्यान शेळ्यांच्या व्यवसायाच्या आडून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी १३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com