महाराजस्व अभियानाचा प्रारंभ

महाराजस्व अभियानाचा प्रारंभ
Published on

महाराजस्व अभियानाचा प्रारंभ

विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान विक्रमगड तालुक्यातील तलाठी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या अभियानाला विक्रमगड मंडळ परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे तसेच शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तर दोन लाभार्थ्यांना आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते ट्रॅक्टरचेही वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये, पुनर्वसन शाखा उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, विक्रमगड तहसीलदार मयूर चव्हाण, गटविकास अधिकारी, निवासी नायब तहसीलदार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com