शुटींगच्या वाहन पार्किंगसाठी  ''बेस्ट'' चे नवे धोरण

शुटींगच्या वाहन पार्किंगसाठी ''बेस्ट'' चे नवे धोरण

Published on

चित्रीकरणाच्या वाहन पार्किंगसाठी ‘बेस्ट’चे नवे धोरण
शुल्कात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : बेस्ट उपक्रमाची आगारे, बस स्थानके या ठिकाणी चित्रीकरणासाठी वाहने येत असतात. यापुढे मात्र चित्रीकरणासाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. आता दरवर्षी पार्किंग शुल्कात १० टक्क्यांनी वाढ करण्यास बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
बेस्टच्या बसना प्रवाशांप्रमाणे बेस्ट उपक्रमाचे डेपो, बस स्थानक या ठिकाणी चित्रीकरण करण्यास चित्रपट निर्माते पसंती देतात. चित्रीकरणासाठी येणाऱ्या वाहनांना बस स्थानकात व बस आगारात पार्किंगचे पैसे द्यावे लागतात. चित्रीकरण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क व सुरक्षा अनामत ठेव याकरिता यापूर्वी २०१४ साली संमती दिली होती. प्रत्येक वर्षाने त्यात १० टक्के वाढ होईल, असे प्रस्तावित करण्यात आले होते. शुल्क आकारणीचा कालावधी ३१ मार्च २०२५ साली संपला होता. परंतु आता पार्किंग शुल्क आकारणीचा कालावधी २०३० असून, प्रत्येक वर्षी १० टक्क्यांची वाढ होणार आहे. तसेच अमानत रक्कम ४० हजार असून, यात कोणतीही वाढ होणार नाही.
बेस्टचे आगार आणि बस स्थानकालगतच्या परिसरात चित्रीकरण करताना पार्किंग उपलब्ध नसल्याने बेस्टच्या बस स्थानकात व आगारात पार्किंगसाठी बेस्टकडे परवानगी मागावी लागते आणि चित्रीकरणाच्या वाहनांना ‘पे अँड पार्क’नुसार दर लावले जातात. मात्र यापुढे चित्रीकरणाच्या वाहनांना नवीन दर लावले जातील. त्यानुसार चित्रीकरणाच्या व्हॅनिटी वॅन, जनरेटर व्हॅन आणि अन्न पुरवणारे वाहन ट्रक यांना दिवसाला पाच हजार रुपये आकारले जाणार असून, अभिनेत्यांच्या खासगी वाहनांना एक हजार रुपये आकारले जाणार आहेत. नव्या धोरणात या गोष्टींचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com