शिवाजीपार्क मैदान परिसरात दर सोमवारी ‘डीप क्लिनिंग’ मोहीम;
शिवाजी पार्क परिसरात दर सोमवारी ‘डीप क्लिनिंग’ मोहीम; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
प्रभादेवी, ता. १२ (बातमीदार) : दादर येथील शिवाजी पार्क जिमखाना परिसरातील मैदान व आजूबाजूचा परिसर अधिक स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी दर सोमवारी सकाळी विशेष स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात नुकतीच शिवाजी पार्क जिमखाना येथे नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार महेश सावंत आणि नगरसेविका विशाखा राऊत उपस्थित होत्या.
बैठकीदरम्यान नागरिकांनी मैदान आणि परिसरात नियमित तसेच सखोल स्वच्छता करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने दर सोमवारी मैदान परिसरात ‘डीप क्लिनिंग’ मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेमुळे परिसर अधिक स्वच्छ व सुशोभित राहण्यास मदत होणार आहे.
स्वच्छता मोहीम सुरळीत पार पडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दर सोमवारी नागरिकांनी आपली वाहने मैदानालगतच्या रस्त्यावर पार्क न करता समोरील बाजूस किंवा पर्यायी ठिकाणी उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवाजी पार्क परिसरात दररोज मॉर्निंग वॉकसाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी अनेक नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक येत असतात. त्यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

