वाढत्या तापमानाने वणव्यांचा धोका

वाढत्या तापमानाने वणव्यांचा धोका

Published on

वाढत्या तापमानाने वणव्यांचा धोका
डहाणू वन विभागाकडून प्रतिबंधासाठी आवाहन
पालघर, ता.१२(बातमीदार)ः उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे वणव्यांचा धोका वाढला आहे. त्यामुळे जंगलातील वन्यजीव तसेच पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन डहाणू वन विभागाने केले आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी, वसई तालुक्यातील तब्बल ९१८.६६ चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र डहाणू वनविभागाकडे आहे. पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर तीनही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या विभागाला उत्तरेस गुजरात राज्य व दादरा-नगर हवेली-दमन-दीव केंद्रशासित प्रदेश, पूर्वेस जव्हार तर दक्षिणेला ठाणे वनविभागाची सीमा आहे. या विभागात १२ वनक्षेत्रे, ५८ परिमंडळे, १६५ नियतक्षेत्रे कार्यरत आहेत. डहाणू वनविभागातील १५ हजार ७४० हेक्टर क्षेत्रातील शेतीमध्ये पाला-पाचोळा जाळण्याच्या प्रक्रिया केली जाते. त्यामुळे जंगलाला आग लागण्याची शक्यता वाढली आहे.
----------------------------------------
जनजागृती मोहीम : वनक्षेत्रालगत राहणारे नागरिक, ग्रामस्थ, पर्यटकांमध्ये विशेष जनजागृती.
जाळरेषा नियोजन : जंगलाच्या सीमा, रोपवन, राज्यसीमा, महामार्गालगत जाळरेषा.
विशेष पथक तैनात : फायर ब्लोअर ५७, फायर बिटर्स ३३, फायर रॅक्स ४, आगप्रतिबंधक गणवेश असलेले १३५ जणांचे पथक तैनात.
रात्रीची गस्त : दिवसासोबतच रात्रीच्या वेळीही वन कर्मचारी नियमित गस्त घालून वणव्याच्या घटनांवर लक्ष ठेवतात.
ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृ----------------------------------------
वर्ष घटना बाधित क्षेत्र(हेक्टरमध्ये)
२०२४-२५ १८० ३८६.५६५
२०२५-२६ ४२ ७०.७७९
-------------------------------
येथे संपर्क करा
- जंगल परिसरात पेटती काडी, सिगारेट, अन्य ज्वलनशील वस्तू टाकू नयेत. वनक्षेत्रात कुठेही आग लागल्याचे आढळल्यास महाराष्ट्र वन विभागाचा टोल-फ्री क्रमांक १९२६ तसेच डहाणू वनविभागाच्या वनवणवा नियंत्रण कक्षाचा ७०१८४५२१०० क्रमांकावर संपर्काचे आवाहन केले आहे.
- वनक्षेत्रात जाणीवपूर्वक आग लावणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ व ३३ तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com