

घनकचरा व्यवस्थापनाची पालिकेत बैठक
विरार (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनामध्ये मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील कचरा संकलन व्यवस्था, कचरा वर्गीकरण, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच कचरा वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या वेळी शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक स्थळे, शाळा परिसर, रुग्णालय परिसर आणि इतर गर्दीच्या भागांमध्ये नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होणार नाही, यासाठी संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.