पालघर जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा

पालघर जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा

Published on

पालघर जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा
अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाचे आवाहन
बोईसर, ता. १२ (वार्ताहर): पालघर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच पंपांवर अनावश्यक गर्दी करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण १२ लाख ५३ हजार ७५४ एलपीजी जोडणी असून, एक लाख २२ हजार १६४ कनेक्शन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत. जिल्ह्यात ५७ एलपीजी वितरक कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, ऑइल कंपन्यांच्या समन्वयातून इंधनसाठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. ११) एलपीजी, पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुरवठा व वितरणात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------------------------------------
वितरण कालावधी २५ दिवसांचा
- जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीए), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) कंपन्यांकडून इंधनाचा नियमित व सुरळीत पुरवठा केला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
- सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिकच्या १८४९.५० रुपये आकारले जात आहेत, तर महिन्याला मिळणाऱ्या सिलिंडरच्या वितरण कालावधी २५ दिवसांचा करण्यात आला आहे.
----------------------------------
पालघर जिल्ह्यातील लाभार्थी
एलपीजी जोडणी : १२,५३,७५४
उज्ज्वला योजना : १,२२,१६४
उज्ज्वला योजनेचे नसलेले लाभार्थी : ११,३१,५९०
एलपीजी वितरक : ५७
----------------------------------
कंपनीनिहाय जोडणी
बीपीसीएल : ३,९९,०००
एचपीसीएल : ७,७७,३८८
आयओसीएल : ७७,३६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com