पोलिस आयुक्त कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

पोलिस आयुक्त कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
Published on

पोलिस आयुक्त कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : पोलिस आयुक्त कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी आता शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. पोलिस आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक आरओ प्लान्ट बसविण्यात आला असून त्याचे उद्‍घाटन नुकतेच ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस आयुक्त कार्यालयात विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक, अतिथी व अधिकारी-कर्मचारी येत असतात. या सर्वांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या आरओ प्लान्टमुळे कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.
या उद्‍घाटनाप्रसंगी पोलिस सहायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक, अपर पोलिस आयुक्त विनायक देशमुख, पोलिस उपायुक्त मुख्यालय-१ डॉ. श्रीकांत परोपकारी आणि पोलिस उपायुक्त मुख्यालय-२ डॉ. पवन बनसोड उपस्थित होते. या उपक्रमामुळे पोलिस आयुक्त कार्यालयात कामकाज पाहणारे पोलिस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी व कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com