

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये अगरबत्ती विक्रीच्या बहाण्याने एका भामट्याने महिलेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देव प्रसन्न होतील, घरात धनवर्षाव होईल, अशा गोड बोलण्याला बळी पडलेल्या महिलेची फसवणूक करत आरोपी क्षणात मंगळसूत्र घेऊन पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ५ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास उल्हासनगर १ येथील वेवस चौक परिसरातील एका इमारतीत घडली. एक अज्ञात व्यक्ती इस्त्रीच्या दुकानात जाऊन दुकानदाराला अगरबत्ती दाखवत ती अत्यंत चांगली असून, तिच्यामुळे देव प्रसन्न होतात आणि घरात धनवृद्धी होते असे सांगू लागला. त्यानंतर त्याने दुकानदाराकडून घराचा पत्ता विचारून त्यांच्या घरी प्रवेश केला. घरात असलेल्या महिलेशीही त्याने अशाच प्रकारे बोलत तिला विश्वासात घेतले. संभाषणादरम्यान त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून देण्यास सांगितले. महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मंगळसूत्र दिले. त्यानंतर आरोपी मंगळसूत्र घेऊन पसार झाला. रामलाल निर्मल यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पत्रे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.