

मुरबाड, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील नढई ते नारिवली या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर यांनी दिली. या निधीतून संबंधित रस्त्याचे साडेपाच मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार असून, संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नढई-नारिवली या मार्गावरून मोठ्या प्रमाणात खडी वाहून नेणारे डम्पर वाहतूक करत असल्याने रस्त्यावर वारंवार खड्डे पडत होते. तसेच रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सुरेश बांगर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.