गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
पालघर येथील आंदोलनातून केंद्र सरकारचा निषेध
पालघर, ता.१२ (बातमीदार)ः घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालघरच्या हुतात्मा चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी महागाईमुळे जगणे कठीण झाले असताना केंद्रातील सरकारने गॅसच्या किमती वाढवण्याचा निषेध करण्यात आला.
यूपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी सामान्य जनतेवर त्याचा बोजा पडू दिला नाही. सबसिडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाही. यूपीए सरकारच्या काळात घरगुती सिलिंडर चारशे रुपयाला मिळत होता. आता एक गॅस सिलिंडर ९०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १,९०० रुपयांवर गेल्याने विद्यार्थी, कामगार, नोकरदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत बसत आहे. या आंदोलनात पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी रोशन पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
----------------------
विद्यार्थी, नोकरदारांना त्रास
शिक्षण, नोकरी, व्यवसाय, व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवण करावे लागते. त्यामुळे हॉटेल, खानावळींना सिलिंडर सहजपणे उपलब्ध होईल, याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, अशी आंदोलकांनी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

