रानमेव्यांचा आदिवासींना आधार
रानमेव्यांचा आदिवासींना आधार
पारंपरिक व्यवसायातून रोजगारनिर्मितीचे साधन
वाणगाव, ता. १२ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत विशेषतः आदिवासीबहुल भागात उन्हाळ्याच्या दिवसांत रानमेवा विक्री उत्पन्नाचे प्रमुख माध्यम असते. माळरानातील विविध फळांची भुरळ खवय्यांना पडल्याने उन्हाळ्यात आदिवासींसाठी उत्पन्नाचे साधन बनते.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी पावसाळ्यात भातपीक, उन्हाळ्यात रानमेव्यावर उपजीविका करतो, पण उन्हाळ्यात पाण्याची कमतरता, रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने रानावनातील रानमेवा विक्रीतून दोन पैसे कमावण्याची संधी मिळते. अशातच सध्या वाणगाव परिसरात पांढऱ्या रंगाच्या जाम फळाला बहर आला असून, बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. बदलत्या हवामानाचा फटका बसूनही रानमेव्याने काही प्रमाणात तग धरला आहे. पारंपरिक व्यवसायातून आदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळतो.
-------------------------------------
२० रुपयांना वाटा
उन्हाळ्यात मिळणारा जाम आदिवासी महिला व पुरुष टोपलीत घेऊन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी पांढऱ्या जाम फळाचा उपयोग होतो. त्यामुळे सध्या २० रुपये वाटा असला तरी खवय्ये आवर्जून विकत घेतात.
------------------------
फळाचे फायदे :
- जाममध्ये ९३ टक्के पाणी असल्याने उष्माघात टाळण्यासाठी उपयोग.
- पोट फुगणे, बद्धकोष्ठतेवर गुणकारी
- ‘अ’ जीवनसत्वाचे भरपूर प्रमाण. मोतीबिंदूचा धोका कमी होतो.
- रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
- फायबर जास्त असल्याने वजन नियंत्रण.
- ‘क’ जीवनसत्वामुळे त्वचेच्या समस्येवर गुणकारी.
-------------------------
जाम फळाच्या विक्रीतून दिवसाला हजार ते बाराशे रुपये सहज मिळतात. उन्हाळ्याचे दोन ते अडीच महिने पांढरा जाम विकून घरखर्च चालवतो. पांढरा जाम आरोग्यवर्धक असल्याने खवय्यांकडून मागणी आहे.
- सुरेश दुबळा, विक्रेता, वाणगाव
---------------------------
उन्हाळ्याच्या हंगामात जाम फळे मोठ्या प्रमाणात तयार होतात. गोडसर, पाणीदार असल्याने या फळात व्हिटॅमिन अ, क, मुबलक प्रमाणात असते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे फळ उत्तम आहे.
- रूपाली देशमुख, गृहविज्ञान शास्त्रज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

