राष्ट्रीय चर्मकार संघाचा धारावीत रौप्य महोत्सवी सोहळा

राष्ट्रीय चर्मकार संघाचा धारावीत रौप्य महोत्सवी सोहळा

Published on

राष्ट्रीय चर्मकार संघाचा धारावीत रौप्यमहोत्सवी सोहळा

धारावी, ता. १२ (बातमीदार) : राष्ट्रीय चर्मकार संघाचा रौप्यमहोत्सवी सोहळा येत्या शनिवारी (ता. १४) सायंकाळी ६ वाजता धारावीमधील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा रौप्यमहोत्सवी सोहळा होणार आहे.
या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी गुरू रविदास महाराज, संत कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि माता फातिमा शेख या संत, राष्ट्रपुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संत रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीचा शुभारंभही या वेळेस होणार असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगांवकर, महासचिव गणेश खिलारे यांनी सांगितले. आंबेडकरी विचारांचा जागर करणारे प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांच्या मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम या वेळेस होणार आहे. तसेच समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कल्पना शिंदे, संतोष भोईर, अ‍ॅड. नारायण गायकवाड, कुंडलिक गवळी, सत्यवान बेलापूरकर, महादेव कृष्णा शिंदे, सिद्राम मारुती नारायणकर यांचा बाबुराव माने यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अभिनेते पुरोगामी वक्ते किरण माने, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या पाली भाषा विभागाचे प्रा. विजय मोहिते, प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकिल अ‍ॅड. सिध्दार्थ हत्तरकर, कक्कया समाज महासंघाचे मुंबई अध्यक्ष निवृत्ती सावळकर, राष्ट्रीय चर्मकार संघाचे नेते रामभाऊ कदम, परशुराम इंगोले, राष्ट्रीय चर्मकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी हे उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर राष्ट्रीय चर्मकार संघाच्या महिला अध्यक्षा शारदा नवले, अध्यक्ष विलास गोरेगांवकर, महासचिव गणेश खिलारे, सुरज भोईर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
-----
बाबुराव माने यांचा सत्कार
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून चर्मकार समाजासाठी संघर्षमय योगदान दिल्याबद्दल माजी आमदार बाबुराव माने यांचा या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे सत्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com