भाजपा प्रभाग १५९ तर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

भाजपा प्रभाग १५९ तर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

Published on

भाजप प्रभाग १५९ तर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा
घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त भाजप प्रभाग क्रमांक १५९ तर्फे नगरसेवक प्रकाश देवजी मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रभागातील शेकडो माता-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समाजसेविका उषा मोरे यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या उपक्रमात विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला मंडळांनी सहभाग घेतला. या वेळी नगरसेवक प्रकाश मोरे आणि समाजसेविका उषा मोरे यांनी उपस्थित महिलांचा सन्मान केला. आयोजकांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com