सरकारी जाहिरातींची थट्टा

सरकारी जाहिरातींची थट्टा

Published on

सरकारी जाहिरातींची थट्टा
कुरार मेट्रो स्थानकावरील एलईडीवर शासनाची माहिती आडवी प्रसिद्ध झाल्याचा प्रकार

कांदिवली, ता. १२ : कुरार मेट्रो रेल्वे स्थानकावर, तिकीट खिडकीजवळ लावण्यात आलेल्या एलईडीवर चक्क शासनाच्या जाहिराती आडव्या दाखविण्यात येत असल्याने, प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रवाशांना मेट्रो रेल्वे स्थानकाची माहिती व नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना आडव्या प्रदर्शित होत, असल्याने वाचता येत नाहीत. विशेष म्हणजे जाहिरीतीमध्ये असणारे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचे फोटोदेखील आडवे झाल्याने, नेमकं मेट्रो व्यवस्थापनाचे याकडे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकप्रकारे सरकारी जाहिरातीची थट्टाच सुरू असल्याची चर्चा बुधवारी (ता. ११) प्रवाशांमध्ये रंगली होती. महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे फोटो असतात. अशात कुरार मेट्रो तिकीट खिडकीजवळ प्रवाशांना मेट्रो रेल्वे आणि शासनाच्या विविध योजनांबाबत नवे प्रकल्प आणि महत्त्वाची माहिती प्रदर्शित केली जाते.
येथील एलईडीवर विमुक्त जाती, भटक्या जमाती घटकांसाठी यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार योजना, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रधान योजना, प्रदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना इत्यादींची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या माहितीसाठी दाखवली जात आहे. मात्र, प्रदर्शित जाहिराती आडव्या दाखविल्या जात असल्याने, वाचता येणे सोप्पी बाब नाही. चक्क शासनाच्या जाहिराती अशा प्रकारे उलट्या स्वरूपात दाखवत असण्याने नेमका हा प्रकार काय, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
काही प्रवाशांच्या मते, प्रवाशांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी मुद्दाम या जाहिराती आडव्या दाखवल्या जात असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे, तर काही प्रवाशांच्या मते, हा मेट्रो स्थानक प्रशासनाचा भोंगळ कारभार असून, त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही प्रवाशांनी सांगितले आहे.

----------------

मेट्रो स्टेशन अधिकाऱ्यांनी कामावर आल्यावर सर्व ठिकाणी लक्ष देणे, बारकाईने पाहणी करणे गरजेचे आहे. एका सामान्य चुकीमुळे गंभीर परिणाम होऊ शकतो.
- सुशांत कोळी, मेट्रो प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com