कार कोसळली खोल दरीत पोलादपूर महाबळेश्वर मार्गवरील बावली टोक जवळील घटना

कार कोसळली खोल दरीत 
पोलादपूर महाबळेश्वर मार्गवरील बावली टोक जवळील घटना
Published on

कार दरीत कोसळली
जीवितहानी नाही; पाच प्रवासी जखमी

पोलादपूर, ता. १२ (बातमीदार) ः पोलादपूर हद्दीतील बावली टोक आंबेनळी घाट येथे एक कार सुमारे ३०० ते ४०० फूट दरीत कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. १२) पहाटे घडली. अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून महाबळेश्वर व प्रतापगड येथील आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

सातारा जिल्ह्यातील लाखवड गावचे काही ग्रामस्थ मुंबईहून आपल्या गावी येत होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील बावली टोक-चिरेखिंडदरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. या अपघातात अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ आणि संगीता संकपाळ हे प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी महाबळेश्वर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी अत्यंत धोकादायक परिस्थितीत उतरून बचावकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जखमींचा बचाव करणाऱ्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ५.३० वाजता कार ३०० ते ४०० फूट दरीत कोसळली. जवळील बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना स्ट्रेचरच्या मदतीने व दोरीच्या साहाय्याने वर काढण्यात आले. या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, आशीष बिरामने, संकेत सावंत तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, सोमनाथ वागदरे यांच्या मदतीस वाडा- कुंभरोशी ग्रामस्थ, चिरेखिंड ग्रामस्थ, पोलादपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com