

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जैन मुनींचा अपघातात मृत्यू
नालासोपारा, ता. १२ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पायी परिक्रमा करत असताना एका जैन मुनींचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) घडली. अपघातात मृत्यू झालेल्या जैन मुनी यांचे नाव नम्ररत्न विजय महाराज (वय २१) असून ते मूळचे गुजरातचे राहणारे आहेत. या घटनेमुळे जैन समाजबांधवावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पालघरच्या ढेकाळे परिसरातील सातीवली प्रताप धाम येथून विरार-शिरसाड फाट्याकडे पायी परिक्रमा करीत येत असताना हा अपघात झाला आहे. भालिवली येथे मुंबई-गुजरात लेनवर ट्रक बंद पडला होता. अचानक पाठीमागून आलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटून त्याने प्रथम ट्रकला धडक दिली नंतर जैन मुनी यांना धडकला. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मांडावी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ट्रक आणि कारचालक दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.