

अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : उलवे परिसरात ३५ वर्षीय तरुणाने वर्षभर १७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच तिला धमकावून तिच्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उलवे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी राकेश घरत (३५) हा उलवे परिसरात राहण्यास आहे. आरोपी राकेश याने मार्च २०२४ पासून पीडितेशी जवळीक साधली होती. त्यानंतर त्याने तिला त्याच्या प्रेमाची मागणी मान्य करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. तिला वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही दिली. याच दहशतीखाली त्याने गेल्या वर्षभरापासून पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. बुधवार (ता. ११) आरोपीने पीडितेवर पुन्हा अत्याचार केला; त्यामुळे पीडितेने या सर्व प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली. संतापलेल्या पालकांनी आरोपीला याबाबत जाब विचारला असता, आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत धमकावले. अखेर पीडितेच्या कुटुंबाने उलवे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार उलवे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.