“मी माझ्या बायकोची हत्या करून आलो

“मी माझ्या बायकोची हत्या करून आलो

Published on

मी माझ्या बायकोची हत्या करून आलो
म्हणत स्वतःच पोलीस ठाण्यात हजर; पोलीसही चक्रावले

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः मी माझ्या बायकोची हत्या करून आलो आहे,” असे सांगत एक व्यक्ती थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलीसही क्षणभर चक्रावून गेले. चारित्र्यावर संशय घेत पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भुतकर आपल्या भावासोबत नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गेला. त्यावेळी त्याने पोलिसांना सांगितले की, “मी माझ्या पत्नीची हत्या करून आलो आहे.” हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी विशालची चौकशी केली. चौकशीदरम्यान विशालने सांगितले की, पत्नी अर्चना हिच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून तो कल्याणमधील उंबर्डे परिसरात तिच्या घरी गेला आणि गळा आवळून तिची हत्या केली.
ही माहिती खरी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी नाशिक पोलिसांनी तात्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर खडकपाडा पोलिसांचे पथक विशालने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले असता, तेथे अर्चना ही मृतावस्थेत आढळली.
माहितीनुसार, विशाल आणि अर्चना यांच्यात काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. दोघांना दोन मुले असून त्यापैकी एक मुलगा विशालकडे तर दुसरा मुलगा अर्चनाच्या आईकडे राहत असल्याची माहिती आहे. अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत विशालने तिची गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक नाशिककडे रवाना झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com