माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
माथेरानच्या विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल कोचिंग कॅम्प
शिक्षण समितीच्या पहिल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
कर्जत, ता. १४ (बातमीदार) ः माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या शिक्षण समितीची पहिली सभा गुरुवारी (ता. १४) हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेच्या कन्हेसर येथील जिल्हा परिषद शाळेला देशात प्रथम मानांकन मिळालेले असल्याने त्या शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी भेट देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. नगरपरिषदेच्या वीर भाई कोतवाल शाळा, प्रा. शांताराम गवाणकर हायस्कूल आणि सेंट झेवियर्स हायस्कूल या तिन्ही शाळांतील विद्यार्थ्यांसाठी कराओके गायन स्पर्धा, फुटबॉल कोचिंग कॅम्प आणि डिसेंबर महिन्यात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती सुनील शिंदे यांनी दिली.
या बैठकीस शिक्षण समितीचे सदस्य प्रतिभा घ्यावे, केतन रामाने आणि सुरेखा साळुंखे यांनी विविध सूचना मांडल्या. तसेच मुख्याध्यापक दिलीप अहिरे, दिनेश ढोले, शिक्षक अभिनय कळंबे आणि नगरपरिषदेचे लिपिक भारत पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

