महामार्गावर अडचणींशी सामना

महामार्गावर अडचणींशी सामना

Published on

महामार्गावर अडचणींशी सामना
पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त, अपघातांचा धोका
कासा, ता. १४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महालक्ष्मी उड्डाणपूल, घोळ येथील पूल तसेच चिंचपाडा परिसरातील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या महामार्गावर वाहने वेगात धावत असताना अचानक खड्डा आल्याने अनियंत्रित वाहनांचा ताबा सुटून अपघाताची शक्यता आहे. तीन वर्षांत सिमेंट काँक्रीटच्या कामादरम्यानही अनेक अपघात घडल्याची नोंद आहे. महामार्ग प्राधिकरणाने अनेक ठिकाणी ८० ते १०० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादेचे फलक लावले असले तरी प्रत्यक्षात रस्त्याची स्थिती सुरक्षित नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकांनी महामार्गावरील अपघातांसाठी ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीदेखील महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.
-------------------------
महामार्गाचे काँक्रीटीकरण चांगल्या दर्जाचे झालेले नाही. अजूनही अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
- विपुल राऊत, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com