कृषी पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन;
कृषी पुरस्कारांसाठी २० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
टोकावडे, ता. १४ (बातमीदार) : कृषी उत्पादन व उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रगण्य आहे. राज्यातील या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी विविध कृषी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. यापूर्वी पुरस्कारांसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रियेस आणि प्रस्तावांची तपासणी व संकलनासाठी वेळ व खर्च होत होता. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार इच्छुकांनी शुक्रवार (ता. २०)पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये ही ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीद्वारे अर्ज सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन आणि अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढून वेग व विश्वासार्हता वाढणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार असून कागदपत्रे एकदाच अपलोड केल्यास ती पुन्हा देण्याची गरज भासणार नाही. तसेच अर्जाची सद्यस्थितीही शेतकऱ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

