रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
बोर्डी रोड रेल्वे प्रशासनाकडे स्थानिकांची तक्रार
बोर्डी, ता.१३ (बातमीदार) ः पश्चिम रेल्वे वरील घोलवड आणि उंबरगाव रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बोर्डी रोड रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पायवाट स्वरूपात तयार करण्यात येणारा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते जतीन चुरी यांनी केली आहे.
१९९४ मध्ये स्थापन झालेल्या स्थानकात मुंबई, सुरतकडे जाणाऱ्या फक्त दोन गाड्या थांबत असल्या तरी प्रवासी संख्या प्रचंड आहे. रेल्वेच्या विविध मागण्याबाबत पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्यामार्फत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, रेल्वे स्थानकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे स्थानकाचा विकास झालेला नाही. अशात रेल्वे स्थानकाच्या फलाटाच्या बाहेर प्रवासाने जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक वर्षापासून येथील सामाजिक कार्यकर्ते पाठपुरावा करीत होते. रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या पश्चिमेकडे ८०० मीटर लांबीचा पायवाट असलेला प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, काम करताना आवश्यक तांत्रिक बाबी हाताळल्या जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाक संबंधित ठेकेदाराशी संपर्क झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

