उद्योगांना युद्धाची झळ

उद्योगांना युद्धाची झळ

Published on

उद्योगांना युद्धाची झळ
इस्राईल-इराण तणावाचा तारापूरला फटका
बोईसर, ता. १४ (वार्ताहर) : इस्राईल-अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेचा फटका तारापूर वसाहतीतील उद्योगांना बसू लागला आहे. विशेषतः कच्चा माल, इंधन, वाहतूक खर्च वाढीमुळे रासायनिक कारखाने अडचणीत सापडले आहेत.
तारापूर औद्योगिक परिसरात केमिकल उद्योगांसोबत स्टील, टेक्स्टाईल विविंग व प्रोसेस हाऊस मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. दरम्यान, इराणकडून होणाऱ्या क्रूड ऑइल पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गेल्या १० दिवसांत सुमारे ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून अनेक उद्योगांनी उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे. बॉयलरसाठी आवश्यक नॅचरल गॅस पुरवठ्यावरही मर्यादा आल्या आहेत. गुजरात गॅस लिमिटेड यांनी उद्योगांना गॅस वापरात ५० टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या असून, अधिक वापर केल्यास दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे गॅसवर चालणारे बॉयलर बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
------------------------------
निर्यात-आयात क्षेत्रावर परिणाम
- समुद्र, हवाईमार्गे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निर्यात-आयात अनिश्चित झाल्याने उद्योगांपुढे नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईहून होणारी हवाई मालवाहतूकही अडचणीत आल्याने कच्च्या मालाची उपलब्धता घटली आहे.
- किमतींवर कोणतेही नियंत्रण नसल्याने उद्योजक आर्थिक तणावाखाली आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कामगार कपात होण्याची भीती असून, कामगारांनी स्थलांतर केल्यास उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका आहे.
- डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने आयात खर्च वाढून अर्थव्यवस्थेवर ताण वाढण्याची शक्यता आहे. एकूणच युद्धस्थिती दीर्घकाळ टिकल्यास औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण अर्थचक्रावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com