अनियंत्रित कंटेनर महामार्गावर उलटला

अनियंत्रित कंटेनर महामार्गावर उलटला

Published on

अनियंत्रित कंटेनर महामार्गावर उलटला
मेढंवण गावाजवळ अपघात; चालक जखमी
कासा, ता.१४ (बातमीदार) : मुंबईहून-गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर अनियंत्रित कंटेनर वळणावरच उलटला. या अपघातात चालक जखमी असून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण परिसरात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास एक घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, यंत्रणांनी तत्परतेने वाहतूक पूर्ववत केली. मेंढवन परिसरातील वळणाचा भाग धोकादायक अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
-------------------------
धोकादायक वळण
तीस वर्षापूर्वी येथे ज्वलनशील टँकर उलटल्याने ११० जणांचा मृत्यू झाला होता. महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामावेळी स्थानिक नागरिकांनी धोकादायक वळणात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली होती. मात्र, महामार्ग प्राधिकरणाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने तांत्रिक सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com