निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद
निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद
प्रभाग समिती कार्यालय लोकार्पण सोहळ्याला गालबोट
विरार, ता.१४ (बातमीदार)ः प्रभाग समिती कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला होता. या गोंधळानंतर शुक्रवारी महापौरांच्या नवीन इमारतीचे हस्ते उद्घाटन सोहळा पार पडले. मात्र, कार्यक्रमाला पालिका अधिकारी गैरहजर राहिल्याने चर्चा रंगल्या होत्या.
विरार-पश्चिम येथे प्रभाग समिती ‘अ’ बोळींजचे नवीन कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (ता.१३) पार पडला. या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत आमदार, खासदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. मात्र, महापालिकेकडून निमंत्रण पत्रिका छापल्या नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, भाजपने याच मुद्द्यावरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरत आंदोलन केले. यावेळी आंदोलनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते मनोज पाटील यांनी केली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर बोळींज प्रभाग समिती कार्यालयाचे उद्धघाटन शुक्रवारी सायंकाळी पार पडले. पण या कार्यक्रमात कोणताही वाद टाळण्यासाठी पालिकेचे अधिकारीही गैरहजर राहिले.
-------------------------
आरोप-प्रत्यारोप
या कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी उपमहापौर मार्शल लोपीस यांनी अशा कार्यक्रमांना सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. तयार झालेली वास्तू लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावी, यासाठी हा सोहळा केला होता. तसेच खुद्द भाजपच्या नेत्यांनी कार्यालयाच्या उद्घाटनात आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे नाव वगळले होते. तेव्हा भाजपने त्यांचा कार्यक्रम केला होता, असे सांगून टोला लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

