मिरा-भाईंदरकर पाणीटंचाईमुळे हैराण
मिरा-भाईंदरकर पाणीटंचाईमुळे हैराण
शटडाऊन कमी करण्याची महापौरांच्या सूचना
भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी, स्टेमकडून शटडाऊन घेतले जाते. त्यामुळे शहराला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने महापौर डिंपल मेहता यांनी शटडाऊनची संख्या कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मिरा-भाईंदरला स्टेमकडून ८७ दशलक्ष लिटर तर एमयडीसीकडून १२५ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर आहे; पण स्टेमकडून ८२ दशलक्ष, एमआयडीसीकडून सरासरी ११७ दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. मिरा-भाईंदर शहराला सद्यःस्थितीत २५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. परंतु दोन्ही स्रोतांकडून २०० दशलक्ष लिटर पाणीच उपलब्ध होत आहे. परिणामी नागरिकांना ३६ ते ४० तासांच्या फरकाने पाणी दिले जाते. एकीकडे दोन्ही स्रोत मंजूर कोट्यापेक्षा कमी पाणी देत असताना पाणी गळती, देखभाल-दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतले जाते. अशावेळी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडून नागरिकांना ६० ते ७० तासांनी पाणी मिळते. शिवाय पाणीपुरवठा वेळापत्रक सामान्य होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतात. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असल्याने महापौर डिंपल मेहता यांनी एमआयडीसी, स्टेम अधिकाऱ्यांची शुक्रवारी (ता. १३) पालिकेत बैठक घेतली. यावेळी शटडाऊनची संख्या कमी करण्याच्या सूचना दोन्ही प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सूर्या योजनेचे पाणी मिरा-भाईंदर शहराला मिळत नाही तोपर्यंत मंजूर असलेल्या कोट्यानुसार पाण्याचा पुरवठा करावा, अशी सूचना केली.
----------
दोन-तीन वेळा समस्या
- स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीला नागला बंदर येथे गळती सुरू झाल्याने स्टेमने आठ तासांचा शटडाऊन घेतला. स्टेमचा पाणीपुरवठा सुरू होत नाही तोच एमआयडीसीकडून सुरू असलेल्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात ठाण्यातील साकेत येथे पम्पिंग बंद केले.
- एमआयडीसीचा पाणीपुरवठा तीन तास बंद झाला. एकाच दिवशी दोन्ही स्रोतांचे पाणी बंद झाल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. महिन्यातून दोन ते तीन वेळा अशीच परिस्थिती उद्भवत असून, उन्हाळा सुरू झाल्याने भविष्यात पाणी संकट वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

