प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा समितीची ‘डोळे आणि कान’ संकल्पनेवर बैठक

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा समितीची ‘डोळे आणि कान’ संकल्पनेवर बैठक

Published on

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा समितीची ‘डोळे आणि कान’ संकल्पनेवर बैठक
शिवडी, ता. १४ (बातमीदार) : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि रेल्वे परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ‘डोळे आणि कान’ (Eyes and Ears) या संकल्पनेअंतर्गत रेल्वे सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. ही बैठक शुक्रवार (ता. १३) रे रोड रेल्वे स्थानक येथील स्थानक प्रबंधक कार्यालयात पार पडली.
पोलिस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुप्त यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत रेल्वे परिसरातील सुरक्षा उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी १९ मार्चला गुढीपाडवा आणि २१ मार्चला रमजान ईद या सणांच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद व्यक्ती, बेवारस बॅग किंवा वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, तसेच चोरी, महिलांची छेडछाड, मारामारी अशा घटनांबाबत त्वरित वर्दीधारी पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले.
याशिवाय सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा बाबींची माहिती पोलिसांना द्यावी, असेही सांगण्यात आले. रेल्वे परिसरात बालमजुरीसाठी होणाऱ्या बालकांच्या तस्करीला प्रतिबंध करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. या बैठकीस रे रोड रेल्वे स्थानकाचे स्थानक प्रबंधक विनायक शेवाळे, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक रवींद्र मेहेर, रेल्वे कर्मचारी, बूट पॉलिश कामगार, सफाई कर्मचारी, कँटीन वेंडर आदी उपस्थित होते. तसेच संशयास्पद हालचालींची माहिती जीआरपी, आरपीएफ किंवा हेल्पलाइन क्रमांक १५१२ आणि १३९ वर देण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com