वसईच्या प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाची जागा वादात

वसईच्या प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाची जागा वादात

Published on

उपजिल्हा रुग्णालयाची जागा वादात
मोजणी अहवाल सादर करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

विरार, ता. १४ (बातमीदार) : वसईच्या नवघर येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी नुकताच आराखडा तयार करण्यात आला; मात्र यातील काही जागेवर अतिक्रमण असल्याने ते हटवून पूर्ण जागा ताब्यात घेऊन आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी आता वसईच्या नवघर येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेची मोजणी करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश वसईच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिले.
वसई पश्चिमेच्या नवघर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तयार करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. मात्र वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे काम रखडलेले होते. अखेर नव्याने सर्वेक्षण करून रुग्णालय इमारतीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार त्या जागेवर सहामजली इमारत आणि १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र या जागेची थातूरमातूर आणि चुकीची मोजणी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. प्राथमिक आरोग्य केंद्राची ६०.७० गुंठे जागा ही केवळ सातबारा उताऱ्यात नोंद आहे. मात्र काही जागेवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. भूमी अभिलेख विभागाने मोजणी न करताच आराखडा केल्याची तक्रार काँग्रेस नेते कुलदीप वर्तक यांनी केली होती. या शासकीय जागेवर एका विकसकाने खरेदी खत तयार करून शासकीय जागा हडप केली आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
नव्याने मोजणी करून अतिक्रमण झालेली जागा ताब्यात घेतल्यास सुसज्ज रुग्णालय तयार होईल, असे वर्तक यांनी सांगितले आहे. यासाठी तेथील अतिक्रमण हटवून पूर्ण जागा ताब्यात घ्या, अशी मागणीही वर्तक यांनी केली आहे. या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी भूमी अभिलेख कार्यालय (टीएलआर), सार्वजनिक बांधकाम खात्याला (पीडब्ल्यूडी) जिल्हा शल्यचिकित्सक यांना मोजणी करून तसा अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
=============================
नवघर येथील जागेची मोजणी करून आराखडाही तयार केला आहे. आता प्रांताधिकाऱ्यांनी पत्र देऊन त्या जागेचा मोजणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाला पुन्हा मोजणी करून त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.
- रामदास मराड, जिल्हा शल्यचिकित्सक पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com