जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित- जिल्हाधिकारी
जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित ः जिल्हाधिकारी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) ः सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही. घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणारा एलपीजी गॅस केवळ घरगुती कारणांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार साठेबाजी व काळाबाजार रोखण्याकरीता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी आवश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे एका सिलेंडरचे वितरण झाल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलेंडरचे बुकिंग करता येईल. जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याने घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंताग्रस्त न होता संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
येथे करा तक्रार
नागरिकांनी घरगुती गॅसचा अनावश्यक साठा करून ठेवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवून घाईगडबडीत गॅस घेण्याचा प्रयत्न करू नये. घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षातील ०२१४१-२२७४५२या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

