मुरूड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
मुरूड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
मुरूड, ता. १४ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड येथील महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या वतीने शिघ्रे व विहूर येथील आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन आदिवासी महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या सामाजिक उपक्रमाद्वारे आदिवासी भागातील महिलांमध्ये मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले तसेच मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेचे महत्त्व, योग्य वापर आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे आदिवासी महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अल्ताफ फकीर, प्रा. रहीम बागवान तसेच महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. स्वाती खराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम महिलांच्या आरोग्य व सन्मानासाठी महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

