गावठी कुक्कुट बेरोजगारांचा आधार
गावठी कुक्कुट बेरोजगारांचा आधार
जव्हारच्या दुर्गम भागात पूरक व्यवसायाचा पर्याय
जव्हार, ता. १४ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या जव्हार तालुक्यात पारंपरिक शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन वेगाने लोकप्रिय होत आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन नियमित उत्पन्नाचे साधन ठरत आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी घराच्या परसात कमी खर्चात कोंबड्यांचे संगोपन करत आहेत. स्थानिक गावरान कोंबड्यांसोबत सुधारित जातींचा वापर केल्यामुळे अंडी उत्पादनात वाढ होत आहे. कोंबड्यांचे वजनही चांगले वाढत आहे. त्यामुळे बाजारात चांगला दर मिळून शेतकऱ्यांना नियमित रोख उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. घरकाम सांभाळत कुक्कुटपालन सहज करता येत असल्याने आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत आहे. अनेक महिला स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून हा व्यवसाय करत आहेत.
-------------------------
ग्रामीण अर्थकारणाला बळ
- कुक्कुटपालनासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज नसल्यामुळे ग्रामीण भागातील युवा वर्ग व्यवसायाकडे वळत आहेत. घरातील अन्नधान्याचे अवशेष, मका, ज्वारीसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांचा उपयोगातून कोंबड्यांचे संगोपन केले जाते. त्यामुळे खर्च कमी, नफा अधिक मिळतो.
- ग्रामीण भागात कुक्कुटपालनामुळे अंडी व मांसाचे स्थानिक उत्पादन वाढत असून गावपातळीवर रोजगाराची संधी निर्माण होत आहेत. परिणामी, जव्हार तालुक्यात कुक्कुटपालन ग्रामीण अर्थकारणाला बळ देणारा पूरक व्यवसाय म्हणून पुढे येत आहे.
------------------------------
अनेकदा रोजगाराच्या शोधात बाहेर फिरत राहिलो; परंतु गावठी कोंबडीपालन हा व्यवसाय कळल्यानंतर कुक्कुटपालन सुरू केले. त्यानुसार चांगला फायदा होत आहे. सध्या माझ्याकडे ४०० पिल्ले आहेत. या कोंबड्यांना भिवंडी, वाडा, पालघर, खानवेल येथून मागणी आहे.
- संदेश पारधी, आपटाळे
------------------------------
मुंबईत कामानिमित्त राहतो; परंतु जव्हारला आल्यानंतर गावठी अंडी, कोंबडी हा अत्यंत आवडीचा विषय आहे. गावरान वातावरणात सांभाळल्या जाणाऱ्या शेतीच्या जोड व्यवसायाला भविष्यात अधिक मागणी वाढेल.
- धीरज साळवे, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

