ठाणे पट्ट्यात

ठाणे पट्ट्यात

Published on

लोकल प्रवासात मोबाईल चोरीला
ठाणे : लोकलमध्ये प्रवास करताना झोपलेल्या मुलुंड येथील जिगर जाधव (वय ३८) या जे. जे. रुग्णालयातील सफाई कामगाराचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. जाधव हे मंगळवारी (ता. १०) रात्री १२.३० वाजता ते सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावरून ठाणे धीमी लोकलच्या जनरल डब्यातून मुलुंडकडे निघाले. दादर स्थानकानंतर त्यांना झोप लागली. दरम्यान, पहाटे २.३० वाजता ठाणे रेल्वे स्थानक यार्ड परिसरात जाग आल्यावर त्यांच्या खिशातील सुमारे ४५ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस पुढील तपास करत आहेत.
........

ठाणे स्थानकात मोबाईलची चोरी
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावर डुलकी लागलेल्या ठाण्यातील मच्छिंद्र तेली (वय २८) या प्रवाशाचा मोबाईल फोन चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. तेली हे ठाण्यातील एका कंपनीत फोटोग्राफर म्हणून काम करतात. बुधवारी (ता. ११) ते सायन येथून डोंबिवली धीमी लोकलने ठाणे येथे आले. सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता ते ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर उतरले. प्रकृती ठीक नसल्याने ते कल्याण बाजूकडील सिमेंटच्या कट्ट्यावर बसले असताना त्यांना डुलकी लागली. याचदरम्यान सुमारे ८.१५ वाजता जाग आल्यावर त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला सुमारे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस पुढील तपास करत आहेत.
............

लोकलमध्ये हातातून पडला मोबाईल
ठाणे : घणसोलीहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकल प्रवासात कल्याण येथील बबलू शाहू (वय २५) या तरुणाचा हातातून मोबाईल पडल्याची घटना समोर आली आहे. बबलू हा तरुण बुधवारी (ता. ११) रात्री सुमारे ८.०९ वाजता ते घणसोली रेल्वे स्थानकावरून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होते. दरम्यान, गाडी ऐरोली स्थानकात येण्यापूर्वी प्रवाशांच्या गर्दीत धक्का लागल्याने त्यांच्या हातातील मोबाईल फोन रेल्वे ट्रॅकवर पडला. यानंतर ऐरोली स्थानकावरील पोलिसांच्या मदतीने शोध घेतला; मात्र मोबाईल सापडला नाही. तसेच फोन बंद येत असल्याने तो अनोळखी व्यक्तीने उचलून नेल्याचा संशय आहे. सुमारे २५ हजार ९९० रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
.....................

वर्तकनगरमध्ये कचऱ्याला आग
ठाणे : वर्तकनगर नाका येथील रामदास गार्डनजवळ मोकळ्या जागेतील कचऱ्याला शनिवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेसह अग्निशमन दल, वर्तकनगर पोलिस आणि महावितरणचे कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, त्या आगीवर ५० मिनिटांत नियंत्रण मिळविले. या वेळी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिले.
..........

माती टाकून मार्ग वाहतुकीसाठी खुला
ठाणे : ठाण्यातील मखमली तलावाजवळ एलबीएस रोडवरील उत्सव हॉटेलसमोर शनिवारी (ता. १४) दुपारी रस्त्यावर ऑईल सांडल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचारी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, सांडलेल्या ऑईलवर माती पसरविण्यात आली. त्यानंतर संबंधित रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com