तृतीयपंथीयांना शासकीय दाखले वाटप

तृतीयपंथीयांना शासकीय दाखले वाटप

Published on

तृतीयपंथींना शासकीय दाखले वाटप
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात विशेष उपक्रम
पनवेल, ता. १५ (बातमीदार) : पनवेल मंडळामार्फत आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’अंतर्गत तृतीयपंथी नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. १२) पनवेल येथील क्रीडा संकुलात उत्साहात झाला.
या शिबिरात आरजू फाउंडेशनच्या ग्रीमा ग्रेस शेल्टर होम फॉर ट्रान्सजेंडर, सुकापूर (पालीदेवद), पनवेल येथील तृतीयपंथी नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या प्रमुख मानसी जानी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला पनवेलच्या तहसीलदार मीनल भोसले व नायब तहसीलदार राजश्री जोगी उपस्थित होत्या. या वेळी तृतीयपंथी नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, शिधापत्रिका तसेच उत्पन्न प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि शासकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार मीनल भोसले यांनी केले. या शिबिरासाठी पनवेल मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांना शासनाच्या योजनांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील सर्व घटकांपर्यंत शासकीय सुविधा पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com