‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्कार वितरण

‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्कार वितरण

Published on

‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्कार वितरण
महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव
उलवे, ता. १४ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने स्वर्गीय यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महेंद्रशेठ घरत यांच्या वतीने आयोजित ‘यमुना स्त्री सन्मान पुरस्कार’ वितरण सोहळा शेलघर, उलवे नोड, नवी मुंबई येथे बुधवारी (दि. ११ मार्च) उत्साहात पार पडला.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच समाजसेवेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे समाजातील महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळते तसेच समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

चौकट
महिलांच्या कार्याला प्रोत्साहन
महिलांच्या विविध क्षेत्रांतील कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजघडणीत महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com